छत्तीसगढमध्ये नऊ स्फोटके जप्त   

धमतरी : छत्तीसढमधील धमतरी जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांनी नऊ शक्तिशाली स्फोटके  जप्त केली. नक्षलवाद्यांनी दोन गावजवळील जंगलात टाकली होती. जिल्हा राखीव पोलिस दल आणि राज्य लष्करी दलाने संयुक्तपणे कारवाईत भाग घेतला.खलारी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चामेंडा आणि सालेहबात गावाच्या जवळच्या जंगलात स्फोटके शनिवारी मिळून आली होती.  जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १०० किलोमीटवर जंगलात नक्षलवाद्यांचे अस्तित्व असल्याचा सुगावा लागला होता. यानंतर पथकांनी जंगलात शोध मोहीम हाती घेतली. त्या अंतर्गत स्फोटके जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

Related Articles